नवी दिल्ली – कार उत्पादक कंपनी फियाटने आपली लीनिया १२५एस ही कार भारतात लॉन्च केली आहे. दिल्लीत या कारची एक्स-शोरूम किंमत ७.८२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. २०१६च्या दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये फियाट लीनिया १२५ एसची पहिली झलक पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर कंपनीने फियाट पुंटो इवो आणि फियाट अवेंचुरा हे मॉडेल्स देखील अतिरिक्त फीचर्ससह बाजारपेठेत उतरवले आहे.
फियाटने भारतात लॉन्च केली लीनिया १२५ एस
फियाट लीनिया १२५ एसमध्ये १.४ लीटर टी-जेट पेट्रोल इंजिन लावण्यात आले आहे आणि हे इंजिन फियाटच्या सध्याच्या मॉडेलच्या इंजिन पेक्षा ११ बीएचपी जास्त पावर देते. कारच्या कॅबिनमध्ये ५ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, मॅप माय इंडिया नेविगेशन, ब्लूटूथ, यूएसबी, ऑक्स कनेक्टिव्हिटी आणि रिअर व्ह्यू कॅमेरासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर एंबिएंट लाइटिंग, रिअर डिस्क ब्रेक आणि डुयल स्टेज ड्राइव्हर एअरबॅग देखील देण्यात आले आहे.