मुंबई : ८ जुलैपासून फ्रीडम २५१ या फोनची देशातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा करणारी रिंगींग बेल ही कंपनी डिलिव्हरी द्यायला सुरुवात करणार आहे.
८ जुलैपासून मिळणार फ्रीडम
पाच हजार फ्रीडम २५१ची डिलिव्हरी पहिल्या टप्प्य़ामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ८ जुलैपासून सुरु करेल असे रिंगींग बेल्सचे मोहितकुमार गोयल यांनी स्पष्ट केले आहे. या स्मार्टफोनबरोबरच कंपनी आता ९,९९० रुपयांमध्ये एलईडी टीव्हीदेखील विकणार असल्याचे गोयल यांनी सांगितले आहे.
२५१ रुपयांमधील असे दोनलाख स्मार्टफोन विकायला आम्ही तयार आहोत, पण यासाठी सरकारकडून सहय़ोगाची अपेक्षा असल्याचे गोयल म्हणाले आहेत. वेगवेगळे आरोप झाल्यानंतरही तीस हजार ग्राहकांनी फोनचे बूकिंग केले, तर सात कोटी लोकांनी यासाठी साइंड अप केले असल्याची प्रतिक्रिया गोयल यांनी दिली. सरकारने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर या कंपनीने फोन बूक केलेल्यांचे पैसे परत दिले. यानंतर ज्यांनी फोन बूक केला होता, त्यांना फोनची डिलिव्हरी मिळाल्यानंतर पैसे घेणार असल्याचा निर्णय कंपनीने घेतला.