फोटोतून चेहरा गायब करणारा चमत्कारी स्कार्फ

scarf
सैफ सिद्दीकी याने सतत ६ वर्षांच्या संशोधनातून फ्लॅश प्रोटेक्शन स्कार्फ तयार केला आहे. हा स्कार्फ घातला असताना कुणीही फ्लॅशसह फोटो काढायचा प्रयत्न केला तरी त्यात संबंधित व्यक्तीचा चेहरा गायबच होतो म्हणजे फोटेात चेहरा येतच नाही. हा स्कार्फ सेलिब्रिटी तसेच स्वतःची प्रायव्हसी जपण्यास प्राधान्य देणार्‍या व्यक्तींमध्ये खूपच लोकप्रिय ठरला आहे. या स्कार्फची किंमत आहे १८ हजार रूपये. या स्कार्फचे नामकरण लशू असे केले गेले आहे.

असे समजते की सैफ सिद्दीकीचा फोटो बाईक रिफ्लेक्टरमुळे बिघडला त्यावरून त्याला असा स्कार्फ डिझाईन करण्याची कल्पना सुचली. या स्कार्फसाठी त्याने रिफ्लेक्टिव्ह फॅब्रिकचा वापर केला. यामुळे फ्लॅश लाईटने फोटो काढल्यास चेहरा व शरीराचा अन्य भाग पूर्ण काळा होतो व त्यामुळे फोटोत चेहरा दिसतच नाही. थोडक्यात हा फ्लॅश प्रोटेक्शन स्कार्फ आहे. हॉलीवूड अभिनेत्री व अ्तिश्रीमंतात गणना होत असलेल्या पॅरिस हिल्टन हिने या स्कार्फचा वापर करायला सुरवात केल्याचेही समजते.

Leave a Comment