जुन्या स्मार्टफोनला करावा लागेल रामराम

facebook
मुंबई: जुन्या स्मार्टफोनमधून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक ही दोन्ही अ‍ॅप डिसेंबरनंतर बंद होणार आहे. त्यामुळे ज्यांना हे अ‍ॅप वापरायचे आहेत; त्यांना आपल्या जुन्या स्मार्टफोनला रामराम करून नवा फोन घ्यावा लागणार आहे.

सध्याच्या काळात मोबाईल फोन हा केवळ फोन करणे आणि घेणे यापेक्षा व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक वापरण्यासाठी जास्त उपयोगात येतो. जुन्या फोनच्या प्रणालीमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या अॅपमधील माहितीचा साठा सुरक्षित करणे शक्य नसल्याने त्यांना जुन्या मोबाईल फोनवर या सेवा देणे शक्य होणार नाही.

त्यामुळे जुने फोन वापरणाऱ्यांनी आपले फोन बदलून अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोजच्या अद्ययावत आवृत्ती असलेल्या ऑपरेटिंग प्रणालीचे फोन घ्यावेत, असा सल्ला व्हॉट्सअ‍ॅपतर्फे वापरकर्त्यांना देण्यात आला आहे.

Leave a Comment