दिल्ली- केंद्र सरकारने एफडीआयसाठी निश्चित केलेल्या नव्या नियमांनुसार ई कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना वस्तूंच्या दरांशी छेढछाड करण्यास मनाई करण्यात आली असली तरी फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील या सारख्या दिग्गज कंपन्यांनी सेलचा धमाका सुरू केला आहे. या साईटवर ३० ते ९० ट्क्के इतक्या प्रंचड सवलतीत वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. या कंपन्यांच्या मते संबंधित वस्तू उत्पादकांनीच या वस्तू कमी किंमतीत दिल्याने सेल लावले गेले आहेत.
ई कॉमर्स कंपन्यांचा सेल धमाका
या वस्तूत प्रामुख्याने कपडे, चपला बूट, सौंदर्य प्रसाधने आणि फॅशन प्रॉडक्टसचा समावेश आहे. स्नॅपडीलने २०१६ फॅशन सेल नावाने ही विक्री सुरू केली असून तेथे कपडे, जोडे व अन्य वस्तूंवर ७० ते ९० टक्के डिस्काऊंट दिला जात आहे. कपडे चपलांवर ३० ते ४० टक्के डिस्काऊंट आहे. फ्लिपकार्ट ही देशातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनीही यात मागे नाही. त्यांनीही अनेक प्रकारच्या मालांवर ५० ते ७० टक्के डिस्काऊंट जाहीर केला आहे तर अमेझॉनने कपडे चपलांवर ७० ट्के तर हँडबॅग्ज, लगेजवर ३० ते ७० ट्के डिस्काऊंट देऊ केला आहे. घड्याळे, ज्युवेलरीवर ३० टक्के डिस्काऊंट आहे.