आता विविध प्रकारच्या राख्या ऑनलाइन खरेदी करा

rakhi
नवी दिल्ली – आपल्या भावाला रक्षाबंधण या सणावेळी खास राखी देण्यासाठी राखीबझार डॉट कॉम या व्यापारी संकेतस्थळाने सेवा सुरू केली असून ग्राहकांना २०१६ वर्षामध्ये आधुनिक स्वरुपातील राखी देण्यात येतील असे सांगण्यात आले. यासाठी नवीन कलेक्शन कंपनीने दाखल केले असून ऑनलाइन खरेदी करणा-यांसाठी घरपोच राखी देण्याची सुविधा सुरू केली. वेगवेगळे आकार, नक्षीकाम आणि भेटवस्तूसह राखीबझार कंपनी ऑनलाइन क्षेत्रात दाखल झाली आहे. ऑनलाइन क्षेत्रामध्ये खरेदी करणा-या ग्राहकांची आवडनिवड लक्षात घेता नवीन कलेक्शन कंपनीकडून आणण्यात आले आहे.

राखीबझार डॉट कॉम हे संकेतस्थळ ई-व्यापार क्षेत्रातील सर्वात मोठे राखी पुरविणारे ऑनलाइन स्थळ आहे. या संकेतस्थळावरून दिल्ली, मुंबई, बेंगळूर आणि चेन्नई सारख्या शहरातून मोठय़ा प्रमाणात मागणी करण्यात येते असे कंपनीचे मालक दिलीप कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment