अरूणाचलमधील चांगलांग – नेटफ्री, फोन फ्री व्हेकेशनसाठी उत्तम

chang1
व्हॉटस अॅप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामची क्रेझ पर्यटनाचा ट्रेंड वाढविण्यास नक्कीच उपयुक्त ठरली आहे यात वादाचा मुद्दा नाही. मात्र अनेकांना आता या सोयीही नकोशा झाल्या असून त्यांना शांत जागी, फोनपासून व नेटपासून दूर असलेली ठिकाणे पर्यटनासाठी पसंतीची ठरू लागली आहेत. आपणही अशाच एखाद्या ठिकाणाच्या शोधात असाल तर अरूणाचलच्या चांगलांगला पर्याय नाही. नेट फ्री व्हेकेशन लिस्ट मध्ये हे स्थळ सध्या टॉपवर आहे. येथे ठरवूनही तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही.

नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या भागात २०० मीटरपासून ते ४५०० मीटर उंचीपर्यंतची विविधता अनुभवता येते. उन्हाळ्यात येथे खूपच मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या भागाचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल तर रस्ता मार्गानेच येथे जावे हे चांगले. येथे खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत. लेक नो रिटर्न, मिओ, नामडंपा नॅशनल पार्क, नामपोंग, टांगजोंग हे शिवलिंग ,हेल पास ही त्यातील कांही प्रमुख प्रेक्षणीय स्थळे.

chang
हिरवाईने नटलेल्या या ठिकाणाशी दुसर्‍या महायुध्दाच्या काळातील अनेक आठवणी निगडीत आहेत. देशातील पहिली सूर्यकिरणे पडणार्‍या या भागात ५० प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात. नो रिटर्न लेक मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या काळात नादुरूस्त होऊन परत येत असलेली विमाने उतरविली जात होती. त्यातील अनेक विमाने बुडालीही. त्यावरूनच या लेकला नो रिटर्न असे नांव दिले गेले. नामडंपा नॅशनल पार्क आवर्जून भेट द्यावे असे. मिओ या छोट्याशा शहराचे सौंदर्य तर वर्णनातीत आहे.

नामपाँग हे भारत म्यानमार सीमेजवळचे ठिकाण येथेच हेल पास आहे. हा पास पार करून जाणे दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अतिशय जीवघेणे होते म्हणजे येथे कुणी सापडलाच तर नरक यातना भोगाव्या लागत त्यावरून त्याला हेल पास असे नांव पडले. जोगफो हे धार्मिक स्थळ असून येथे शिवलिंग आहे. त्याला टांगजोंग असे म्हणतात.

आसामच्या दिब्रुगड विमानतळापासून चांगलांग १३६ किलोमीटरवर आहे तर तिनमुकीया रेल्वे स्थानकापासून हे अंतर आहे ९५ किमी.

Leave a Comment