सेल्फीप्रेमींना मिळू शकते सेल्फी एल्बोची भेट

selfy
सेल्फी काढण्याबाबत तुम्ही क्रेझी असाल तर तुम्हाला सेल्फी एल्बोची भेट मिळू शकते असा इशारा अस्थिरोग तज्ञांनी दिला आहे. टेनिस खेळाडूंना जसा टेनिस एल्बोचा त्रास होतो तसेच अति सेल्फी काढणार्‍यांना सेल्फी एल्बोचा त्रास होत असल्याचे दिसून आले असून अनेक जणांना हा त्रास होऊ लागला आहे. या आजारात हाताच्या कोपर्‍यात असह्य वेदना होतात व हात वर धरून ठेवणे अशक्य बनते.

सेल्फी फोटो घेताना हात वर उचललेला व विशिष्ठ परिस्थितीत वाकलेला असतो. याचा ताण कोपरावर व त्याच्या आजूबाजूच्या स्नायूंवर येतो व हे स्नायू सुजतात. परिणामी कोपरा दुखू लागतो व कांही वेळा या वेदना सहन करण्यापलिकडे जातात. आधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी शरीर यांच्यातील इंटरअॅक्शन अति वाढल्याने अनेक दुखण्यांना निमंत्रण मिळत असल्याचेही अस्थिरोग तज्ञांचे म्हणणे आहे. सेल्फी एल्बो कमी होण्यासाठी वेदनाशामक औषधे, बर्फाचे शेक व कांही व्यायाम प्रकार उपयुक्त ठरतात. मात्र हा आजार होऊ नये यासाठी सेल्फी काढण्याचे प्रमाणच कमी करा असा सल्ला ते देत आहेत. या व्याधीचे प्रमाण तरूण वर्गात अधिक दिसून येत असल्याचेही समजते.

Leave a Comment