सदाबहार जीन्सविषयी तुम्ही हे जाणता?

jeans
आजकाल कोणतीही फॅशन जीन्सशिवाय असूच शकत नाही. लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी जीन्स हा फॅशन आयकॉन बनला आहे. महिला पुरूष दोन्हीतही जीन्स विलक्षण लोकप्रिय प्रकार आहे. मात्र जीन्स फॅशनमध्ये खर्‍या अर्थाने सामील होण्यासाठी १९७० चे दशक उजाडावे लागले. वास्तविक जीन्सचा वापर १६ व्या शतकापासूनच केला जात आहे याची तुम्हाला माहिती आहे का?

जीन्सचा वापर फार पूर्वीपासून होत आहे मात्र तो त्यावेळी केवळ कामगार वर्ग आणि नाविकांसाठी केला जात होता. भारतात डेनिम ट्राऊजर्स डुंगा नाविक वापरत असत व त्यांना डंगरीज म्हटले जाई. फ्रान्समध्ये नेव्हीचे वर्कर युनिफॉर्म म्हणून जीन्स वापरत. या जीन्स इंडिगो डायने निळ्य रंगविल्या जात. १६ व्या शतकात जीन्सचा वापर वाढला मात्र त्यांना लोकप्रियता मिळाली १८५० साली. जर्मन व्यापारी लेवी स्ट्राॅस याने कॅलिफोनिर्यात स्वतःच्या नावाने जीन्स बाजारात आणल्या.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत वर्कर्स जीन्स वापरत. त्या जीन्सना पुरूषांसाठी झिप खालच्या भागात असे तर महिलांसाठी ती साईडला असे. स्पेन, चीनमध्ये तेथील काऊबॉय वर्कर्स जीन्स वापरत. फॅशन म्हणून जीन्सचा वापर १९५० साली सुरू झाला. हॉलीवूड चित्रपट रेबल विदाऊट कॉज यात नायक जेम्स डीन याने प्रथम फॅशन म्हणून जीन्स वापरली. ती टिनएजर्स व तरूणांत लोकप्रियही ठरली मात्र तिचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून त्या काळात रेस्टॉरंट, थिएटर व शाळांत जीन्स वापरावर बंदी घातली गेली. १९७० पासून मात्र तिचा फॅशन म्हणून स्वीकार केला गेला व आजही जीन्सची क्रेझ आहे. गरीब, श्रीमंत, लहान, थोर, महिला, पुरूष, तरूणाई यांचे जीन्सचे आकर्षण थोडेसेही कमी झालेले नाही.

Leave a Comment