आजपासून पुरीत जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ

jagannath
पुरी- आजपासून ओडिशातील जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ होत असून १० लाख भाविक या रथयात्रेला उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ओडिशातील सुरक्षाव्यवस्था रथयात्रेनिमित्त कडक करण्यात आली आहे. याबाबत ओडिशाचे पोलीस महानिरीक्षक के. बी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गरज असेल त्या ठिकाणी हवाई पाहणी देखील करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांवरही कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment