‘नॅस्कॉम’ने घेतला ‘नेट न्यूट्रॅलिटी’चा पक्ष

net-nutrality
नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था ‘नॅस्कॉम’ने ‘नेट न्यूट्रॅलिटी’चा पक्ष घेतला आहे. ग्राहकांना मोफत इंटरनेट डाटा देण्याबाबत सेवा दात्यांना ‘ट्राय’ने पूर्ण स्वातंत्र्य द्यावे; अशी मागणी ‘नॅस्कॉम’ने केली आहे.

मोफत इंटरनेट देण्याबाबत ‘ट्राय’ने ‘नॅस्कॉम’कडे अभिप्राय मागितला होता. त्याच्या उत्तरादाखल सादर केलेल्या पत्रात मोफत डाटा देण्याचे स्वातंत्र्य सेवा दात्या कंपन्यांना असावे; अशी मागणी ‘नॅस्कॉम’ने केली आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटवर काय पहिले जात आहे; यावर सेवा दात्यांचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नियंत्रण अथवा नियमन नसावे; अशी अपेक्षाही संस्थेने व्यक्त केली आहे.

वापरकर्त्यांना इंटरनेटचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन देणे; हा मोफत डाटा देण्यामागचा उद्देश आहे. हा मोफत डाटा वापरकर्ते कसा वापरतात यावर कोणतेही बंधन असता कामा नये; असे ‘नॅस्कॉम’ने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Leave a Comment