टीसीएलचा पहिला स्मार्टफोन भारतीय बाजारात आला

tcl560
टेलिव्हीजन उत्पादनातील अग्रणी चीनी कंपनी टीसीएलने त्यांचा पहिला स्मार्टफोन टीसीएल ५६० भारतीय बाजारात आणून या बाजारपेठेत पहिले पाऊल टाकले आहे. हा फोन अॅमेझॉन इंडियावर ७९९९ रूपयांत उपलब्ध करून दिला गेला आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये आय व्हेरिफाय टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष निकोलस जिबेल या संदर्भात म्हणाले की हा फोन युजरच्या डोळ्यांची ओळख पटल्यावरच अनलॉक होतो. फोन अनलॉक करण्यासाठी युजरला फ्रंट कॅमेर्‍याच्या सहाय्याने डोळ्यांची ओळख पटवावी लागते यालाच आय व्हेरिफाय टेक्नॉलॉजी असे म्हणतात. यामुळे हा फोन अत्यंत सुरक्षित आहे व दुसरा कोणीही विनापरवानगी तो अनलॉक करून वापरू शकत नाही.

या फोनसाठी ५.५ इंची एचडी आयपीएस डिस्प्ले, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, एलईडी फ्लॅशसह ऑटोफोकस ८ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रं ट कॅमेरा, ड्यु्अल सिम, व्हाईस ओव्हर एलटीई अशी फिचर्स दिली गेली आहेत. कनेक्टिव्हीटीसाठी फोरजी, थ्रीजी, एज, जीपीआरएस, ब्ल्यू टूथ, वायफाय अशी अनेक ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment