एस्सार स्टील पुणे प्रकल्प, उलाढालीत लक्षणीय वाढ

essar
पुण्यातील एस्सार स्टीलच्या प्रकल्पाच्या उलाढालीत ४३ टक्के वाढ नोंदविली गेली असून २०१७ च्या पहिल्या तिमाहीत त्यांची उलाढाल ३ हजार कोटींचा टप्पा गाठेल असे समजते. सणसवाडीतील या प्रकल्पात गॅल्वनाईझिंग, प्री कोटेड स्टील यांचे उत्पादन केले जाते. दरवर्षी येथे ६ लाख टन प्रोसेस्ड स्टील तयार केले जाते.

गेले वर्ष स्टील उद्योगासाठी नरमाईचे राहिले आहे तरीही कंपनीने उत्पादन संशोधन, कॉस्ट कटिंग, नवीन बाजारपेठांचा शोध यात सातत्य राखून उलाढाल वाढविण्यासाठी कसून प्रयत्न केल्याचे कंपनीचे सीईओ आर.व्ही.श्रीधर यांनी सांगितले. ते म्हणाले उलाढाल वाढीसाठी आम्हाला चीनमधील आयात ड्यूटीवर दिलेल्या सवलतींचाही फायदा झाला.

कंपनी कॉमाफ्लेज स्टील, वुड फिनिश, अॅब्रेशन विरोधक स्टील, रिंकल फिनिश प्रॉडक्ट बनविते व हा माल ऑटोमोबिल, डिफेन्स, गृहोपयेागी वस्तू उत्पादने, बांधकाम या क्षेत्रात वापरला जातो. एस्सार स्टील प्री पेंटेड स्टीलचे देशातील मोठे उत्पादक असून त्यांचा बाजारपेठेतील वाटा ५१ ट्के आहे. कंपनीची निर्यात अनेक देशांत होते त्यात अफ्रिका, ईयू या देशांचा नव्याने समावेश झाला आहे.

Leave a Comment