मोटो जी ४ प्ले लवकरच भारतीय बाजारपेठेत

moto
मुंबई: ‘मोटोरोला’चा ‘मोटो जी ४ प्ले’ हा नवा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये असणार आहे.

आयात, निर्यात सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या जौबा या वेबसाईटवर ‘मोटो जी ४ प्ले’ची नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीवरून या फोनची किंमत उघड झाली आहे.

या फोनमध्ये ५ इंचाचा एच डी १२८० बाय ७२० पिक्सलचा डिस्प्ले असणार आहे. यामध्ये १.२ गीगाहर्टस कॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४१० कॉडकोअर प्रोसेसर आणि २ जीबी रॅम आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो ३०६ जीपीयू इंटिग्रेटेड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ४ जी फोनमध्ये १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते १२८ जीबीपर्यंत वाढविण्यात येते. मागच्या वर्षी कंपनीने वाजारात आणलेल्या मोटो जी ३ ची मोटो जी ४ प्ले ही सुधारित आवृत्ती आहे.

Leave a Comment