जुलैमध्ये लाँच होणार फोर्ड मस्टँग

ford
नवी दिल्ली : आपल्या पॉवरफुल इंजिनच्या बाबत जगभरात प्रसिद्ध असलेल्या वाहन उत्पादक कंपनी फोर्डने आपली बहुचर्चित नवी फोर्ड मस्टँग ही कार येत्या जुलै महिन्यात लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. या कारची किंमत ६० लाखांच्या घरात असणार आहे.

भारतामध्ये लाँच होणा-या फोर्ड मस्टँग या कारमध्ये ५.० लिटरचे टीआय-व्हिसीटी व्हि८चे इंजिन देण्यात आले असून या इंजिनच्या माध्यमातून ४३५ बीएचपीचे पॉवर आणि ५४२एनएमचा टार्क जनरेट करु शकणार आहे. या कारमध्ये ६ स्पीड सिलेक्टशिफ्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये स्टायलिश हेड लँम्पस्, रिअर डिफ्युझर आणि १८ इंच मॅग्नेटिक ग्लॉस पेंट ऍल्युमिनियम व्हिल देण्यात आले आहे. तसेच या कारमध्ये एलइडी हेड लँम्पस्, एलइडी टेल लँम्पस्, लाँच कंट्रोल, क्रॉस ट्रफिक अलर्ट, डय़ुअल फ्रंट एअरबॅग असे अन्य फिचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

Leave a Comment