स्टेट बँकेची मानवरहित शाखा – इनटच

intouch
देशाची अग्रणी बँक स्टेट बँकेने डिजिटलायझेन प्रोसेसमध्ये मोठी झेप घेतली असून स्टेट बँक इनटच नावाने मानवरहित शाखा देशाच्या विविध भागात सुरू केल्या आहेत. उत्तराखंडमध्येही हल्दानी जिल्ह्यात अशीच ७०वी शाखा सुरू झाली असून या शाखांतून कर्मचार्‍यांची सर्व कामे मशीन्स करणार आहेत. ग्राहकांचा वेळ वाचावा या उद्देशाने अशा शाखा सुरू केल्या जात असल्याचे रिजन वनचे असिस्टंट जनरल मॅनेजर एम.पी. सिंग यांनी सांगितले.

ते म्हणाले नेक्स्ट जनरेशन शाखांतून केवळ दोन कर्मचारी असतील व तेही मशीन्स कशी चालवायची याची माहिती ग्राहकांना देण्यासाठी असतील. या शाखांतून खाते उघडणे, एटीएम कार्ड घेणे, पैसे भरणे, काढणे, पासबुक प्रिटींग, कर्जासाठी अर्ज करणे अथवा गुंतवणुकीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तज्ञांचा सल्ला घेणे अशी सर्व कामे कांही मिनिटांच्या आत होत आहेत. या शाखा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहेत. कौंटरवर प्रत्येक कामासाठी ताटकळून रहावे लागणार नसल्याने ग्राहकांचा वेळ वाचणार आहे.

Leave a Comment