सर्वोत्कृष्ट नोकरीसाठी ‘गुगल इंडिया’ अव्वल

google
नवी दिल्ली – गुगल इंडिया भारतात नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या कंपन्यांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाले आहे.गेल्यावर्षी कर्मचाऱ्यांना आरामशीर वातावरण आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली गुगल इंडिया कंपनी दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यापाठोपाठ आर्थिक सेवा क्षेत्रातील अमेरिकन एक्सप्रेस इंडिया आणि उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

अमेरिकन एक्सप्रेस इंडिया गेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात चौथ्या तर उज्जीवन फायनान्स तब्बल चोवीसाव्या क्रमांकावर होती. देशातील कॉर्पोरेट कार्यालयाविषयी एका इंग्रजी वृत्तपत्राने ‘ग्रेट प्लेस टू वर्क‘ संस्थेकडून केल्या जाणाऱ्या वार्षिक सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यंदा सुमारे ८०० कंपन्या व १.५५ लाख कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेण्यात आले. मॅरियट हॉटेल्स, ओबेरॉय समुह व लेमन ट्रीसारख्या प्रमुख आदरातिथ्य क्षेत्रातील कंपन्यांना पहिल्या १० कंपन्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्याशिवाय, टेलिपरफॉर्मन्स इंडिया, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स, सॅप लॅब्स इंडिया आणि इनट्युट प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेंटरसारख्या भिन्न क्षेत्रातील कंपन्या नोकरीसाठी सर्वोत्तम ठरल्या आहेत.

Leave a Comment