फिचरफोनच्या किंमती वाढणार

feature
आगामी काळात फिचर फोनच्या किंमतीत ५ टक्कयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या फोनसाठी बॅटरी, स्क्रीन सारखे सुटे भाग मोठ्या प्रमाणावर चीनमधून आयात केले जातात. चीनमधील कांही कारखाने बंद पडले आहेत परिणामी या सुट्या भागांचा पुरवठा कमी झाला आहे व त्यामुळे दर वाढले आहेत.त्यंाचा परिणाम फिचर फोन महागण्यात होत असल्याचे समजते.

इंडियन सेल्युलर असोसिएशन या मोबाईल फोन उद्योजकांच्या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज महेंदू म्हणाले, चीनमधून सुट्या भागांचा पुरवठा घटला आहे त्यामुळे दर वाढले आहेत. भारतात स्मार्ट फोन विक्री वाढत असली तरी आजही ६० ट्क्के युजर फिचर फोनचा वापर करत आहेत. ट्रायच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१६ पर्यंत भारतात ८२.६ कोटी ग्राहक फिचर फोन वापरत आहेत. सुटे भाग पुरेश्या प्रमाणात मिळत नाहीत व त्यामुळे या फोनच्या किंमती ५ टक्कयांनी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment