नवी दिल्ली – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नेटवर्कच्या गुणवत्तेची माहिती मिळविण्यासाठी माय स्पीड हे नवे अॅप विकसित केले आहे. ग्राहक, धोरण ठरविणारे लोक आणि दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या या सर्वांनाच या अॅपमुळे मिळणाऱ्या माहितीचा फायदा होणार आहे.
नेटवर्कच्या गुणवत्तेची माहिती देणार ट्रायचे माय स्पीड अॅप
ग्राहकांना या अॅपच्या माध्यमातून त्यांच्या नेटवर्कचे डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग स्पीड कळणार असून, तो ट्रायपर्यंत पोचविण्याचा पर्याय येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. ट्रायला ही माहिती मिळाल्याने गैरप्रकार करणाऱ्या कंपन्यांवर आळा घालता येईल; तसेच सर्वांना समान नेटवर्क मिळेल अशी आशा आहे.
हे अॅप आणि वायरलेस या दोन्ही नेटवर्कबद्दलही माहिती देण्यास सक्षम असल्यामुळे युजर वापरत असलेल्या वाय-फाय डिव्हायसेसचे नेटवर्क स्पीडही समजू शकेल. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या वेळी पाहिलेल्या नेटवर्कची माहिती एका यादीमध्ये जतन करून ठेवली जाते, ती हवी तेव्हा पाहणेही शक्य आहे.