कार्बनचा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लॉन्च

karbbon
मुंबई : आपला एन्ट्री लेव्हल अँड्रॉईड स्मार्टफोन ए९१ स्ट्रोम भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी कार्बनने लॉन्च केला आहे. नव्या हँडसेटला कंपनीने वेबसाईटवर लिस्ट केले असून, या स्मार्टफोनची किंमत फक्त २ हजार ८९९ रुपये आहे.

काही दिवसांपूर्वीच इंटेक्सने आपला २ हजार ९९९ रुपयांचा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन एक्वा क्लासिक लॉन्च केला होता. कार्बनचा हा स्मार्टफोन इंटेक्सच्या स्मार्टफोनला मोठा स्पर्धक ठरणार आहे. कार्बन ए९१ स्ट्रोम ड्युल सिम स्मार्टफोन असून, अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे. त्याचप्रमाणे ४ इंचाचा स्क्रीन (४८०×८०० पिक्सेल रिझॉल्युशन) आणि १.२GHz क्वाड-कोर प्रोसेसर, ५१२ एमबी रॅम, २ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ०.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ४ जीबीची इंटरनल मेमरी आणि ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा असून, कनेक्टिव्हिटीमधअये ३जी, जीपीआरएस, ब्लूटूथ, वाय-फाय, एफएम रेडिओ, एज, मायक्रो-यूएसबी २.० सारखे फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये २२००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment