अवघ्या ५ मिनिटांत मिळणार रेल्वेचे तिकीट

railway
नवी दिल्ली – आता रेल्वेचे तिकीट प्रवाशांना फक्त ५ मिनिटांतच मिळणार आहे. या सुविधेसाठी देशातील सर्व रेल्वे स्टेशनसाठी सिटिझन चार्टर बनवण्यात आला असून तो रेल्वेच्या वेबसाइटवर १५ ऑगस्टपूर्वी अपडेट करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या चार्टरनुसार, रेल्वे स्टेशनच्या ए१ आणि ए श्रेणीतील रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या समस्यांचे पाच मिनिटांच्या आत निवारण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर ऑन बोर्ड हाउसकीपिंग सर्व्हिसेसला वीस मिनिटांत समस्यांचे निवारण करण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या सर्व सेवांसाठीही कालावधी निश्चित करण्यात आला आहे. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी १ हजार रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन आहे. यासाठी तयार केलेल्या निर्भया कोषसाठी ५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Leave a Comment