शंभर कोटींच्या पुढे पोहचले बांके बिहारी

banke-bihari
शंभर कोटीच्या घरात वृंदावनमधील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचे उत्पन्न पोहोचले आहे. मंदिराच्या उत्पन्नात मागच्या तीनवर्षात दुप्पटीने वाढ झाली आहे. देणगीची रक्कम आणि ठेवींवरचे व्याज मिळून एकूण रक्कम ६७ कोटींवरुन ११२ कोटी झाली आहे.

१८६४ मध्ये स्थापन झालेल्या या मंदिराचे २०१५-१६ वर्षातील एकूण उत्पन्न ११२ कोटी आहे. उत्पनामध्ये मोठी रक्कम देणगी स्वरुपातून जमा होते. मंदिर व्यवस्थापन समितीने फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेल्या रक्कमेवर जे व्याज मिळते त्यामुळे मंदिराने शंभर कोटीचा टप्पा पार केला आहे. तिरुपती बालाजी, मुंबईतील सिद्धीविनायक, शिर्डीचे साईबाबा मंदिर ही देशातील श्रीमंत देवस्थाने आहेत. देणगी आणि व्याज स्वरुपात या मंदिरांचे वार्षिक उत्पन्न कोटयावधीच्या घरात आहे. बांके बिहारी मंदिरांच्या भक्तांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून, चालू आर्थिकवर्षात हे उत्पन्न आणखी वाढेल असे सूत्रांनी सांगितले. २०१५ मध्ये १.२६ कोटी भक्तांनी मंदिराला भेट दिली असे उत्तरप्रदेशचे पर्यटन अधिकारी अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.

Leave a Comment