शामला नदीतील रहस्यमय सहस्त्रलिंगे

shama2
कर्नाटकाच्या कन्नडा जिल्ह्यातील आजपर्यंत कधीही कोरडी न पडलेली शामला नदी दुष्काळ व पाण्याच्या अतिउपशामुळे रोडावली असून या नदीतील प्राचीन खजिना त्यामुळे उघड्यावर आला आहे. या नदीतील खडकांवर हजारो शिवलिंगे, अन्य मानवी प्रतिमा, ब्रह्मा, नंदी, माकडे, उडती विमाने यांच्या आकृत्या दिसू लागल्या असून त्या पाहण्यासाठी प्राच्यविद्या संशोधकांबरोबरच पर्यटकही मोठी गर्दी करत आहेत.

shama1
सध्या नदीचे पाणी कमी झाल्याने ही शिवलिंगे दिसत आहेत आणि शेकडो वर्षे पाण्याखाली राहूनही ती अतिशय स्वच्छ व सुस्थितीत आहेत. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार राजा सदाऐश्वर्य याने १७ शतकांत ही शिवलिंग कोरून घेतली असावीत. याजागी कदाचित एखादी प्राचीन संस्कृतीही असावी. येथील कांही शिवलिंगे कंबोडियातील अतिप्राचीन अंगोरवट मंदिरातील शिवलिंगाशी साध्यर्म दाखविणारीही आहेत. तसेच खडकांत कोरली गेलेली विमाने ही स्वर्गातून पृथ्वीवर येण्यासाठी देवांनी वापरलेली वाहने असावीत असाही तर्क केला जात आहे. याचाच अर्थ त्या काळातही आकाशयानांची नुसती कल्पना नव्हती तर त्याचे ठोस चित्रही लोकांच्या नजरेसमोर होते याचा हा पुरावा मानला जात आहे.

Leave a Comment