शाओमीचा Mi मॅक्स लाँच

mi-max
मुंबई – आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Mi मॅक्स स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीने लाँच केला आहे. हा आजपर्यंतचा कंपनीचा सगळ्यात मोठा स्मार्टफोन असून मध्यमवर्गीयांना परवडणारी अशी कंपनीने याची किंमत १४,९९९ रु. ठेवली आहे.

६ जुलैपासून Mi मॅक्सचा फ्लॅश सेल Mi.com वर सुरू होणार असून या नव्या फ्लॅगशीपसाठी गुरुवारी (३० जून) नोंदणी सुरु झाली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीने ROM MIUI 8 लाँच केला. या स्मार्टफोनला कंपनीने भारतात स्नॅपड्रॅगन ६५० SoC, ३२ जीबी स्टोरेज सोबत लाँच केला आहे. चीनमध्ये या फोनचे तीन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. शाओमीने असेही सांगितले की, भारतात या स्मार्टफोनचे ४ जीबी रॅम व्हेरिएंटही लाँच करण्यात येईल. ज्याची किंमत १९,९९९ रु. असेल.

शाओमी Mi मॅक्स स्मार्टफोनच्या फीचर पाहिल्यास याचा डिस्प्ले ६.४४ इंच आहे. शाओमीचा हा हँण्डसेट मात्र मेटल बॉडी लेस आहे. यामध्ये १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची बॅटरीही फारच दमदार आहे. ४८५० mAh क्षमेतीच बॅटरी आहे. हा फोन ४जी सपोर्टिव्ह आहे.

Leave a Comment