जीपची रँग्लर अनलिमिटेड एसयूव्ही

wrangler
जीपने त्यांच्या चेरोकी बरोबरच रँग्लर अनलिमिटेड एसयूव्ही दिवाळीच्या सुमारासच भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. सॉफ्ट व हार्ड टॉप अशा दोन्ही प्रकारात ती उपलब्ध केली जाणार आहे. ही एसयूव्ही साधारण २५ ते ३० लाख रूपयांपर्यंत विकली जाईल असेही सांगितले जात आहे.

या एसयूव्हीला मेटल डोअर, रोल अप विंडो, अॅटोमेटिक हॅलोजन हेडलँप, व फॉग लँप दिले गेले आहेत. विंडस्क्रीनमध्ये टीनटेड ग्लासचा वापर केला गेला असून तिला ऑफरोडर टायर्स दिल्याने खडबडीत रस्त्यांवरही तिची पकड मजबूत राहते. या मॉडेलचे एकच व्हेरिएंट भारतात येणार आहे. याला २.८ लिटरचे डिझेल इंजिन, पाच स्पीड अॅटोमेटिक गिअरबॉक्स दिले गेले असून इंधन टाकीची क्षमता ८५ लिटरची आहे. ही एसयूव्ही लिटरला १२.१ किमीचे मायलेज देते.

या एसयूव्हीचे इंटिरियरही आकर्षक असून ऑल ब्लॅक व ब्लॅक अॅन्ड डार्क सँडल कलर त्यात वापरला गेला आहे. लेदर सीट आरामदायी व मागे फोल्ड होणार्‍या असल्याने सामानासाठी जादा जागा मिळू शकते. सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट मल्टीस्टेज एअरबॅग्ज, इलेक्ट्राॅनिक स्टॅबिलीटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल दिला गेला आहे. मनोरंजनासाठी ६.५ इंची टच स्क्रीन, युकनेक्ट इंफोटेनमेंट सिस्टीम, नॅव्हिगेशन, ब्ल्यू टूथ, व्हाईस कमांड, ऑडिओ सिस्टीमसाठी ४० जीबीची इंटरनल मेमरी शिवाय २८ जीबीची स्टोरेज दिले गेले आहे.

Leave a Comment