अमेरिकी लष्करात ट्रान्सजेंडरही देणार सेवा

trans
पेंटागॉन या अमेरिकी संरक्षण संस्थेने एक ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला आहे. त्यानुसार अमेरिकी लष्करात ट्रान्सजेंडरच्या प्रवेशावर असलेले निर्बंध दूर करण्यात आले आहेत. रक्षामंत्री एश्टन कार्टर यांनी त्वरीतलक्ष्यी प्रभावाने हा निर्णय लागू झाला असल्याचे जाहीर केले आहे.

केवळ लैंगिक ओळख ही सेनेतील सेवेसाठी बाधक ठरू शकणार नाही असे सांगून ते म्हणाले की ट्रान्सजेंडरनाही देशसेवेचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी ते लष्करात सामील होऊ शकतात. केवळ ट्रान्सजेंडर आहेत म्हणून त्यांना सेवेतून कमी करणे हे योग्य नाही. कोणत्याही व्यक्तीची लैंगिक ओळख सेना सेवा वा अन्य कार्यासाठी बाधा ठरता कामा नये असा सरकारचा प्रयत्न आहे. या लोकांनाही लष्करात अन्य कर्मचार्‍यांप्रमाणेच सर्व अधिकार, मानके लागू होणार आहेत. लष्करी गणवेशात असलेले ट्रान्सजेंडर कोणताही अन्याय यापुढे सहन करणार नाहीत व त्यांना सेवेतून या कारणासाठी बाहेरही पडावे लागणार नाही असेही कार्टर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment