विवोचे एक्स ७ व एक्स ७ प्लस बाजारात दाखल

vivo
चीनी कंपनी विवो ने त्यांचे एक्स सेव्हन व एकस सेव्हन प्लस स्मार्टफोन स्थनिक बाजारात लाँच केले आहेत. पैकी एक्स सेव्हन ७ जुलैपासून तर प्लस १५ जुलैपासून मिळणार आहेत. सेव्हनची किंमत २५००० हजार रूपये असून हे दोन्ही फोन गोल्ड व रोझ गोल्ड कलरमध्ये आहेत.

या दोन्ही फोन्सची अनेक फिचर्स समान आहेत. दोन्हीलाही १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. युनीमेटल बॉडी, फिंगरप्रिंट स्कॅनर फिजिकल होम बटणमध्ये एंबेड आहे. ४जीबी रॅम, ड्युअल सिम, अँड्राईड ५.१ लॉलिपॉपवर आधारित फनटच ओएस, आणि कनेक्टिव्हीटीसाठी फोर जी, थ्रीजी, ब्ल्यू टूथ,वायफाय, जीपीआरएस,एज, मायक्रो यूएसबी, अशी ऑप्शन्स आहेत.

एक्स सेव्हनसाठी ५.२ इंचाचा फुल एचडी सुपर एमोलेड २.५ डी डिस्प्ले, ६४ जीबी इंटरनल मेमरी दिली गेली आहे तर एक्स सेव्हन प्लससाठी ५.७ इंची सुपर एमोलेड २.५ डी स्क्रीन व १२८ जीबी मेमरी दिली गेली आहे. दोन्हीसाठी १३ एमपीचा रिअर कॅमेरा आहे.

Leave a Comment