पोर्शने लाँच केली ९११ रेंजची स्पोर्टस् कार

porsche
नवी दिल्ली : जगभरात आपल्या हाय परफॉर्मस् कारसाठी जर्मनची ऑटोमोबाईल निर्माण कंपनी पोर्श ही ओळखली जाते. भारतामध्ये या कंपनीने ९११ रेंजची स्पोर्टस् कार लाँच केली असून १.४२ करोड (दिल्ली-एक्स शोरुम) रुपयांपासून ते २.८१ करोड रुपयांपर्यंत या स्पोर्टस् कारची किंमत असणार आहे.

आर्कषक असे या स्पोर्टस् कारचे डिझाइन बनवण्यात आले आहे. तसेच याच्या इंजिनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. या स्पोर्टस् कारमध्ये पूर्वीपेक्षा अनेक नवे बदल करण्यात आले आहेत. या स्पोर्ट्स कारमध्ये करेरा ट्विन-टर्बो युनिट असून ३७० हॉर्सपॉवर जनरेट करु शकणार आहे. त्याचबरोबर या कारमध्ये ३.० लिटर इंजिन असून ते ४२०HPचे पॉवर जनरेट करु शकणार आहे.याबरोबरच स्टिअरिंग व्हिलच्या मागे डिजिटल साधनाचा समावेश करण्यात आला आहे. या कारमध्ये ७ इंचाचा इंफोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये अँड्राइड आणि आयओएसचा स्मार्टफोन सहजरित्या अटॅच करता येऊ शकतो. तसेच यामध्ये ७ स्पीडचा डय़ुअल क्लच ऑटोमेटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.