जखोलीतील दुर्योधन मंदिर

durdhon
महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे दुर्योधन. अर्थात दुष्टतेचे प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असल्याने देशात दुर्योधनाची मंदिरे फार कमी आहेत. दुर्योधन हा पुजनीय न मानला गेल्याने त्याचे पूजा विधीही फारसे माहिती नाहीत. मात्र उत्तराखंडातील जखोली या गावी दुर्योधनाचे मंदिर आहे. येथील नागरिकांना या मंदिराबाबत आनंदही नाही, अभिमान तर नाहीच नाही उलट असला तर विषादच आहे.

असेही सांगतात की कांही वर्षांपूर्वी पर्यंत या मंदिरात बदल करून ते शिवमंदिर बनविले गेले होते व त्याचे सोमेश्वर असे नामकरणही केले गेले होते. या गावातील मंदिरात सोन्याची कुर्‍हाड आहे व तिची पूजाअर्चा नियमितपणे केली जाते. ही कुर्‍हाड दुर्योधनाची असल्याचे सांगितले जाते. गावातील नागरिक स्थानिक देवदेवतांच्या पुजेबरोबरच ही कुर्‍हाडी पूजतात. त्यावेळी नृत्यगायनाचे कार्यक्रमही केले जातात. असा समज आहे की दुर्योधन कसाही असला तरी तो या गावचा रक्षणकर्ता आहे त्यामुळे त्याला नाही पण त्याच्या या हत्याराला मात्र येथे मान दिला जातो.

Leave a Comment