ओली – पहिली थ्रीडी प्रिंटेड मिनीबस

olli
थ्रीडी प्रिटींग टेक्नॉलॉजीने आज जगभरात धमाल केली आहे. आता थ्रीडी प्रिंटींग तंत्रज्ञानाने विमानेही बनविली जाणार आहेत. सध्या या तंत्रज्ञानाचा वापर बस व कार बनविण्यासाठीही होत आहे. मात्र जगातील पहिली थ्रीडी प्रिटींग टेक्नॉलॉजी मिनिबस बनविण्याचे श्रेय अमेरिकेतील लोकल मोटर्स या कंपनीकडे जाते. त्यांनी ओली या नावाने ही मिनीबस तयार केली असून तिच्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत.

ही विनाचालक इलेक्ट्रीक बस स्वयंचलित आहे. ही बस बनविण्यासाठी आयबीएम सुपर कॉम्प्युटर प्लॅटफॉर्म वॉटसनची मदत घेतली गेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या या बसची प्रवासी क्षमता १२ लोकांची आहे. या बसचे वैशिष्ठ आहे आयबीएम वॉटसनचे इंटरनेट ऑफ थिग्ज (आयओटी) तंत्रज्ञान. यामुळे प्रवासी गाडीशी इंटरअॅक्शन करू शकतात. बसचे काम कसे चालले आहे, कुठे जायचे आहे, बसने ड्रायव्हिंगसंदर्भात कसे निर्णय घेतले यावर बोलताना प्रवासी बसकडून संबंधित ठिकाणची प्रेक्षणीय स्थळे कोणती याचा सल्लाही घेऊ शकतात. हे फिचर प्रवासाचा पुरेपूर आनंद घेत असताना प्रवास आरामदायी बनावा यासाठी दिले गेले आहे. या बसचा वापर मिटींगसाठी मोबाईल कॅफेप्रमाणेही करता येणार आहे.

Leave a Comment