१६ हजारांपेक्षा अधिक पदवीधारक सुशिक्षित बेकार !

engineer
अहमदाबाद : अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडलेले तब्बल १६ हजारांपेक्षा अधिक पदवीधारक गुजरातमध्ये सुशिक्षित बेकार असल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षी अभियांत्रिकी क्षेत्रातील १६ हजारांपेक्षा अधिक पदवीधारकांची राज्यातील रोजगार हमी कार्यालयात नावनोंदणी झाली आहे. लहानपणापासून बहुतेक विद्यार्थ्यांचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न असते.

हे स्वप्न उराशी बाळगून हे विद्यार्थी योग्य ती पूर्वतयारी करून अभियांत्रिकी शाखेकडे जाण्याचा प्रयत्न करतात. या क्षेत्रातील संधी, लठ्ठ पगार, प्रतिष्ठा आदी बाबींमुळे गुजरातमधील तरुणांनादेखील या क्षेत्रात भूरळ पडलेली आहे. वाढत्या बेकारीचा परिणाम राज्यातील महाविद्यालयांवर झालेला दिसतो. अभियांत्रिकीसाठी असलेल्या ३० हजार जागा आज रिक्त आहेत. दरवर्षी या रिक्त जागांचे प्रमाण वाढत आहे. रिक्त जागांची समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे बाजारातील परिस्थितीचे सर्वेक्षण न करता अभियांत्रिकीच्या जागा वाढविणे ही आहे, अशा प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.

राज्याच्या २०१२ च्या सामाजिक आर्थिक अहवालातील निष्कर्ष बघता, दरवर्षी रोजगार हमी कार्यालयात ११,४५१ अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी नावनोंदणी करतात. ही संख्या २०१६ मध्ये वाढून १६,५५९ इतकी झाली आहे. प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात मात्र वेगळेच चित्र रंगविले जाते. उच्चशिक्षित गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराची कमी नाही. चांगल्या संस्थांमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्याथ्र्यांना नोकरी शोधणे हे फार अवघड राहिलेले नाही. मात्र महाविद्यालयातून थेट एखाद्या कंपनीत संधी देणा-या महाविद्यालयांचे प्रमाण हे केवळ ३० टक्केच आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या नामांकित महाविद्यालयांमधून विद्याथ्र्यांची निवड करून त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करतात. यामुळे विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिकांची, कंपन्यांची ओळख होते. मात्र इतर क्षेत्रात असे प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळांचे आयोजन केले जात नसल्याने विद्यार्थी आणि सबंधित क्षेत्रातील दरी वाढत आहे.

Leave a Comment