रोल्स रॉईसचे विनाकॅप्टन कार्गो शिप

cargo
ब्रिटनच्या जगप्रसिद्ध रोल्स राईस कंपनीने मानवरहित रिमोट कंट्रोल्ड कार्गो शिप तयार केले असून ते २०२० पर्यंत समुद्र सफरींसाठी तयार असेल असे समजते. ही कंपनी या जहाजाच्या निर्मितीसाठी अनेक वर्षे काम करते आहे. हे जहाज नेहमीच्या कार्गो शिपपेक्षा अधिक वेगवान, पर्यावरणपूरक म्हणजे कमी प्रदूषण करणारे व ऑपरेट करण्यासाठी स्वस्त असेल.

या जहाजाचे नियंत्रण जमिनीवरून करता येणार आहे. जहाजावर व्हर्च्युअल डेक असेल व ऑपरेटरला कॅमेर्‍यातून जहाजाचा ३६० अंशातून व्ह्यू दिसणार आहे. ब्रिज विंडोतून जहाजाच्या आसपासची परिस्थिती, वातावरण, धोके समजू शकणार आहेत. थोडक्यात हें मानवरहित विशाल ड्रोन शिप असेल. यात कार्गोसाठी सोयीनुसार जागा वाढविता येते व १ व्यक्ती अशा प्रकारची अनेक जहाजे मॉनिटर व ऑपरेट करू शकते. २०२० साली हे जहाज बाल्टीक समुद्रात उतरेल असे समजते.

आज जगात शिपिंग इंडस्ट्री ३७५ अब्ज डॉलर्सची आहे व जगातला ९० टक्के व्यापार हा जहाजांवरूनच केला जातो.

Leave a Comment