या हॉटेलात जाण्यासाठी चढा ६० हजार पायर्‍या

hotel
पायर्‍यांची संख्या एकूनच दम लागला का? पण आज जगात अनेक हॉटेल्स त्यांच्या खास वैशिष्ठ्यांसाठी प्रसिद्ध झाली आहेत त्यातीलच हे एक हॉटेल- जेड स्क्रीन. या फोर स्टार हॉटेलमध्ये पोहोचणे हेच मुळात एक आव्हान आहे. कारण हे हॉटेल जगातील सर्वात दुर्गम ठिकाणी आहे. चीनच्या यलो माऊंटन पर्वतरांगातील हे हॉटेल अनेक दृष्टीने अजब आहे. जगातील हे असे एकमेव हॉटेल आहे जेथे इतक्या संख्येने पायर्‍या आहेत व त्या चढून जाणारेही अनेक उत्साही आहेत.

hotel2
समुद्रसपाटीपासून १८३० मीटर उंचीवर हंगशन माऊंटनमध्ये बांधले गेलेले हे हॉटेल अनेक लग्झरी सुविधांनी युक्त आहे. येथे स्पा, स्विमिंग पूल सारख्या सुविधा आहेतच पण येथे येणार्‍या पर्यटकांत परदेशींबरोबरच स्थानिक पर्यटकही मोठ्या संख्येने आहेत. प्रेमी युगलांसाठी हे हॉटेल खास मानले जाते. येथे येऊन हे प्रेमी रेलिंगवर कुलूप घालून प्रेम यशस्वी व्हावे असा नवस करतात आणि किल्ली फेकून देतात. इतक्या प्रचंड संख्येने पायर्‍या चढून प्रेमासाठी केलेला नवस हमखास पूर्ण होतो अशीही श्रद्धा आहे.

hotel1
पायर्‍यांची संख्या ऐकून येथे भेट देण्याचा विचार रद्द मात्र करू नका कारण येथे जाण्यासाठी दंडी, कंडी तसेच रोप वेची व्यवस्थाही आहे. पण हॉटेलकडे जाताना जी अप्रतिम निसर्गदृष्ये दिसतात, त्यांनी डोळे तृप्त करून घ्यायचे असतील तर मात्र पायर्‍या चढण्याशिवाय पर्याय नाही.

Leave a Comment