देशउभारणीचे काम ‘नरेंद्र मोदी अॅप’ करेल

modi-app
नवी दिल्ली : ‘नरेंद्र मोदी अॅप’ हे देश उभारणीसाठी युवकांचे योगदान मिळावे म्हणून एक माध्यम होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या अॅपमुळे मी आनंदी असून देशातील तरुणांना या अॅपमुळे स्वयंस्फूर्तीने व संघटनकौशल्यासाठी प्रेरित होतील, असे मोदी यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.

‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे देशातील काही युवक एकत्रित येऊन स्वयंस्फूर्तीने देशउभारणीसाठी मेहनत घेत होते. मी त्या युवा मित्रांचे अभिनंदन करतो. त्यांच्या एकत्रित येण्यातून निर्माण झालेल्या कल्पनांचा आदर करतो, असे मोदी यांनी ट्विटद्वारे सांगितले.

Leave a Comment