जगातल्या सर्वात मोठ्या हिर्‍याला खरेदीदार नाही

hira
जगातील सर्वात मोठा अनघड हिरा अशी नोंद झालेल्या लेझेडी ला रोना ( अर्थ आमचा प्रकाश) खरेदीदारांविना विकला गेला नसल्याचे सॉथबी ऑक्शन हाऊसकडून सांगितले गेले. गेल्या नोव्हेंबरमध्ये बोत्सवानाच्या खाणीत सापडलेला हा हिरा ११०९ कॅरटचा असून तो अडीच अब्ज वर्षे जुना असल्याचेही समजते. हा हिरा सर्वोत्तम गुणवत्तेचा आहे व त्याचा लिलाव सॉथबी तर्फे लंडन येथे केला जाणार होता. या हिर्‍यासाठी किमान बोली ७ कोटी डॉलर्सची होती मात्र त्याला १० लाख डॉलर्सपर्यंतच बोली मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या १०० वर्षात इतक्या उच्च गुणवत्तेचा हिरा मिळालेला नाही. सॉथबीच्या जडजवाहिर विभागाचे अध्यक्ष डेव्हीड बेनेट म्हणाले, या हिर्‍यात एकही दोष नाही. त्याचा आकार टेनिस चेंडू इतका आहे व क्लॅरिटी उच्च पातळीवरची आहे. इतक्या मोठ्या हिर्‍याचा यापूर्वी कधीच सार्वजनिक लिलाव झालेला नाही. हा हिरा विकला गेला तर बोत्सवाना सरकारला त्यातील ६० ट्के रक्कम दिली जाणार आहे.

या हिर्‍यापेक्षाही मोठा १ च हिरा दक्षिण अफ्रिकेत १९०५ साली मिळाला होता व ब्रिटनचे किंग एडवर्ड सेव्हन यांना तो भेट म्हणून दिला गेला होता. ३१०६ कॅरटच्या या हिर्‍याचे ९ तुकडे केले गेले व ते सर्व ब्रिटनच्या शाही परिवाराकडे आहेत.

Leave a Comment