रिलायन्स अर्थ टू फोन कॅमेरा आवाजाने होणार कंट्रोल

earth
रिलायन्सने त्यांच्या लाईफ सिरीजमधील अर्थ टू हा नवा स्मार्टफोन मंगळवारी लाँच केला आहे. या फोनसाठी फ्रंट व रियरला १३ एमपीचे कॅमेरे दिले गेले आहेतच पण या अल्ट्रा प्रिमियम फोनमधील कॅमेरा आवाजाने कंट्रोल होऊ शकणार आहे. फोनची किंमत १९९९९ रूपये आहे. हा फोन काळा, पांढरा, हिरवा व गोल्डन रंगात उपलब्ध आहे.

या फोनसाठी अॅल्युमिनियम अॅलॉय बॉडी, पाच इंचाचा स्क्रीन, कॉनिग गोरिल्ला थ्री ग्लास प्रोटेक्शन, अँड्राईड ५.१.१ ओएस, ३जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, कॅमेर्‍यासाठी लेजर ऑटोफोकस सुविधा तसेच पिन, रेटिना लॉक, फिंगरप्रिट सेन्सर, गॅलरी लॉक अशी फिचर्स दिली गेली आहेत. कनेक्टीव्हीटीसाठी फोरजी, एलटीई, व्होल्ट, वायफाय, ब्ल्यू टूथ, यूएसबी अशी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment