एका इमारतीत सामावले आहे अख्खे गांव

vitear
अमेरिकेच्या अलास्का भागातील एक छोटा कसबा व्हिटीयर येथील वसाहत व व्यवस्थेमुळे जगभरात चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे या भागात असलेल्या एकमेव १४ मजली इमारतीत हे सर्व गांव वसले आहे. या इमारतीचे नांव आहे बोगेच टॉवर. या इमारतीशिवाय येथे अन्यत्र वस्ती नाही व म्हणून या गावाला व्हर्टिकल टाऊन असेही म्हटले जाते. या इमारतीत २०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. शिवाय पोलिस स्टेशन, हॉस्पिटल, प्रोव्हिजन स्टोअर्स, लाँड्री, चर्चही याच इमारतीत आहे.

शीतयुद्ध काळात याचा वापर लष्कराच्या बराकी म्हणून केला जात होता. आजही येथील कांही गोष्टी गुप्तच ठेवल्या गेल्या आहेत. मात्र आता ही इमारत एक शहर म्हणून वापरली जात आहे. येथे घरमालक राहतात तसेच इमारतीतल्या उद्योगात काम करणारे कर्मचारीही राहतात. सर्व कारभार एकाच इमारतीत असल्याने लोकांना बाहेर येण्याजाण्याचा त्रास नाही. मात्र येथील लाईफस्टाईलही वेगळी आहे. एकतर या भागात बरेचवेळा हवामान खराबच असते त्यामुळे नागरिक बाहेर सहजी हिंडू फिरू शकत नाहीत. येथे अन्य शहरातून येणारा रस्ताही पहाडातून व अडचणींचा आहे. मात्र येथे समुद्रमार्ग आहे आणि येथे शिपिंगचा व्यवसायही चालतो.

Leave a Comment