स्टारबक्स- टाटा भारताबाहेरही एकत्र

bucks
स्टारबक्स कार्पोरेशन आणि टाटा ग्रूप भारताबाहेरही व्यवसाय सहकार्य सुरू ठेवणार असल्याचे स्टार बक्सचे चायना व एशिया पॅसिफिकचे ग्रूप प्रेसिडेंट जॉन कल्व्हर यांनी जाहीर केले आहे. पाच वर्षांपूर्वी स्टार बक्स व टाटा ग्रूपमध्ये परस्पर सहकार्य करार झाला असून टाटांच्या मुल्लोर इस्टेट मध्ये पिकविली गेलेली व सिएटल मध्ये लाँच झालेली रोस्टेड कॉफी ही भारतातली पहिली कॉफी आहे. सिंगापूरमध्ये हिमालयन मिनरल वॉटर उपलब्ध करून दिले गेले आहे.

स्टार बक्स ही जगातील सर्वात मोठी कॉफी रिटेलर असून टाटांचा स्पेशल टी ब्रँड टिव्हाना भारतात वर्षअखेर लाँच केला जात आहे. या दोन जागतिक कंपन्यांची भागीदारी केवळ व्यवसाय व जॉईंट व्हेचरपुरती मर्यादित नाही असेही कल्व्हर यांनी स्पष्ट केले आहे. या दोन कंपन्या भारताबाहेरही त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी तयार असल्याचे सांगून ते म्हणाले, विस्ताराच्या सर्व फ्लाईटस तसेच जेव्ही व सिंगापूर एअरलाईन्स मध्ये स्टारबक्स कॉफी सर्व्ह केली जाणार आहे.

Leave a Comment