सूर्यप्रकाशात सप्तरंगात उजळणारी मशीद

mosque2
निसर्गासारखा महान कलाकार नाही आणि त्याला मानवी बुद्धीची जोड मिळाली तर एकापेक्षा एक अजोड कलाकृती जन्म घेतात. निसर्ग आणि मानव यांच्या सहयोगातून तयार झालेली ईराणमधील नासीर अल मुल्क मशीद याला अपवाद नाही. सूर्याची पहिली किरणे या मशीदीवर सप्तरंगी जादू पसरवितात आणि ती पाहताना दोन डोळे पुरे पडत नाहीत असा अनुभव सर्वांनाच येतो. अर्थात सूर्यकिरणांना येथे जोड दिली गेली आहे ती रंगीत काचांनी बनविलेल्या सुंदर आकृत्यांची.

mosque
कजर वंशाचा शासक मिर्झा हसन अली नासीर अल मुल्क याच्या आदेशाने शिराज येथे या मशीदीचे काम १८७६ साली सुरू केले गेले होते. सतत १२ वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही मशीद १८८८ साली तयार झाली. गुलाबी मशीद म्हणून ही जगभरात प्रसिद्ध आहे. मशीदीच्या भिंतीतून,खिडकयातून सुंदर आकृत्यामध्ये बसविल्या गेलेल्या रंगीत काचांचे तुकडे आणि सूर्याची पहिली किरणे या मशीदीच्या सौंदर्याला अक्षरशः चार चाँद लावतात. जगभरातील फोटोग्राफर आपल्या कॅमेर्‍यात ही जादू बंदिस्त करण्यासाठी येथे येत असतात.

mosque1
ही मशीद पारंपारीक इस्लामी शैलीचा अजोड नमुना आहे मात्र मशीदीच्या रांगीत काचांच्या खिडक्या हे या मशीदीचे वेगळेपण. इस्तंबुलची निळी मशीद व अल अक्सा सारख्या काही मोजक्याच मशीदीतून अशा रंगीत काचांचा वापर केलेला आढळतो.

Leave a Comment