मंगळवरील मातीच्या नमुन्यात पिके पिकविण्याचा यशस्वी प्रयोग

farming
लंडन – पृथ्वीवर नासाच्या रोव्हरने पाठविलेल्या मंगळवरील मातीच्या नमुन्यात पृथ्वीवरील पिके पिकविण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून मानवी आरोग्यासाठी ही भाजी योग्य असल्याचा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे.

२०१३ पासून मंगळ आणि चंद्रावरील मातीच्या नमुन्यांमध्ये पीके घेण्याचे प्रयत्न नेदरलॅण्डमधील वागेनिन्गेन विद्यापीठात सुरू आहेत. मागील वर्षी याचा पहिला प्रयोग यशस्वी झाला होता. त्यामध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारची पीके घेण्यात यश मिळाले. मंगळावरील मातीच्या नमुन्यात यापूर्वी अनेक प्रकारची खनिजे असल्याचे आढळून आले होते. याच संशोधनाचा पुढचा टप्पा म्हणून या नमुन्यात पिके पिकविण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. हा निष्कर्ष नक्कीच चांगला आहे. या भाज्यांची आम्ही प्रत्यक्ष चव घेणार आहोत आणि त्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. या पिकांची चाचणी केवळ जड धातूंचे प्रमाण पाहण्यासाठी केली नसून त्यातील जीवनसत्वांचे तसेच काही मूलद्रव्यांचे प्रमाणही तपासण्यात आले आहे, असे वरिष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विगेर वॅमलिंक यांनी सांगितले.

Leave a Comment