बैदू विनाचालक कारचे व्यावसायिक उत्पादन करणार

baidu
चीनी टेक जायंट कंपनी बैदूने येत्या पाच वर्षात विनाचालक कार्सचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन सुरू केले जात असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेन बैदूने थेट अमेरिकन कंपनी गुगल व ब्रिटीश टेस्ला कंपनीला आव्हान दिले आहे. या ऑटोनॉमस व्हेईकल इंडस्ट्रीचे अध्यक्ष सांग यांग यांनी बैदू कारच्या चाचण्या चीनमधील १० शहरात लवकरच घेतल्या जात असल्याचे सांगितले.

या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकरण बैदूने तीन वर्षांपूर्वीच केले आहे. त्यात गुगलवर कंपनीने आघाडी घेतली असून पहिल्या चाचण्या मिक्स रोडवर पार पाडल्या गेल्या आहेत. आता हवामान, वाहतूक, गर्दी अशा विविध प्रकारातील चाचण्या घेतल्या जाणार आहेत. २०१३ मध्ये कंपनीने या कारचा प्रोजक्ट हाती घेतला आहे. या कारमध्ये हाय प्रिसिजन इलेक्ट्रीक मॅपिंग, पोझिशनिंग, सेन्सिंग व डिसीजन मेकींग तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

Leave a Comment