मधुमेहावरील ‘सीएसआयआर’चे आयुर्वेदिक औषध बाजारात

csri
बंगळुरु – मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) बाजारात आणले असून या औषधाचे नाव बीजीआर-३४ असे असून ते टाईप-२ मधुमेह प्रकाराच्या उपचारासाठी उपयोगात येईल. राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (एनबीआरआय) आणि केंद्रीय औषध व वनस्पती संस्था (सीआयएमएपी) यांच्या संशोधक गटाने लखनौमध्ये या औषधाचे अनावरण केले. केवळ ५ रुपये बीजीआर-३४ ची किंमत बाजारात असून डीपीपी-४ च्या तुलनेत स्वस्त आहे. मधुमेहावरील आधुनिक औषधे त्यांच्या दुष्परिणामामुळे कुप्रसिद्ध आहेत मात्र बीजीआर-३४ रक्तातील साखरेचा स्तर संतुलित ठेवतो तसेच इतर धोकादायक परिणामांवर मर्यादा आणतो.