कारागृहात राहून पास झाला आयआयटी

studant
कोटा – ८ बाय ८च्या कारागृहात राहून एक विद्यार्थी चक्क आयआयटीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. ही कोटा येथील ओपन जेलमधील गोष्ट असून या जेलमध्ये त्याचे वडील जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, पण त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे मागील दोन वर्षांपासून त्यांना ओपन जेल मध्ये ठेवण्यात आले आहे. जिथे ते बाहेर जाऊन काम देखील करू शकतात. पण फूल चंद गोयल एवढे पैसे कमवत नसल्यामुळे त्यांना त्यांचा मुलगा पियुष याला हॉस्टेलमध्ये ठेवून शिकवू शकतील. त्यामुळे त्यांनी त्याला आपल्यासोबत ठेवून त्याचे आयआयटीचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

पीयूष गोयल आता वडिलांसोबत ओपन जेलमध्येच राहतो आणि टेम्पोने कोटा येथील कोचिंग संस्थेत जाऊन शिकत होता. याबाबत अधिक माहिती देताना फूल चंद गोयल यांनी सांगितले कि याबातीत जेल प्रशासनाने त्यांना पूर्ण ते सहयोग केले. येथे विशेष सुविधा नसताना देखील त्यांना जेल प्रशासनाने त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी योग्य ती सुविधा उपलब्ध करून दिली.

Leave a Comment