एन.एस. विश्वनाथन यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती

rbi1
नवी दिल्ली – मंगळवारी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी केंद्रीय निवड समितीकडून एन.एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून एन.एस. विश्वनाथन हे कार्यरत होते. सध्या डेप्युटी गव्हर्नरपदावर असणाऱ्या एच.आर.खान यांचा कार्यकाळ ३ जुलै रोजी संपुष्टात येणार असल्यामुळे विश्वनाथन यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.

रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक एम.पात्रा, दिपाली पंत जोशी, चंदन सिन्हा आणि दिपक मोहंती यांच्यादेखील डेप्युटी गव्हर्नरपदासाठी एन.एस. विश्वनाथन यांच्याबरोबर मुलाखती झाल्या होत्या. रिझर्व्ह बँकेचे एकुण चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात. यापैकी दोघांची निवड अंतर्गत पद्धतीने होते, तर उर्वरित दोघांपैकी एक व्यावसायिक बँकर आणि पतधोरण समितीचा मुख्य अर्थतज्ज्ञ असतो.

Leave a Comment