३-५ टक्क्यांनी घसणार ब्रिटिश हवाई वाहतूक

aeroplane
जिनिव्हा : ब्रिटन युरोपीयन संघातून जनमत चाचणीने दिलेल्या कौलामुळे बाहेर पडणार असून याचाच परिणाम म्हणून २०२० पर्यंत ब्रिटिश हवाई वाहतूक ३-५ टक्के घसरू शकते. आर्थिक धोरणात होणारे बदल, चलनाचे बदलणारे दर यामुळे ही घट होईल, असे मत आंतरराष्ट्रीय हवाई संघटनेने (आय. ए. टी. ए.) व्यक्त केले आहे.

११७ दशलक्ष प्रवाशांनी २०१५ या वर्षी युके ते युरोपीयन संघात प्रवास केला आहे. या घटनेनंतरही युके ते युरोपीयन संघाचे जे संबंध आहेत ते कायम राहायला हवेत, अशी आशा आयटाचे कार्यकारी अधिकारी टॉनी टायले यांनी व्यक्त केली.आयटाच्या अहवालानुसार दोन वर्षांनंतर याचे परिणाम जाणवू लागतील, असे सांगण्यात आले आहे. याचा परीणाम ब्रिटनला मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो. आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परीणाम होऊ शकतो. अंतर्गत वाहतुकीवर याचा फारसा परिणाम जाणवणार नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. युरोपीयन युनियन व ब्रिटन यांच्यात नवीन करार होईपर्यंत तरी गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम दिसून येतील.

Leave a Comment