सोने गाठणार ३३,५०० रुपयांची पातळी!

gold
मुंबई : सोन्याच्या दरात ब्रिटनच्या जनमत चाचणीनंतर मोठी वाढ झाली. जाणकारांच्या मते, वर्षअखेरीस सोन्याचे दर अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, भूराजकीय तणाव आणि चलन बाजारातील चढ-उतारामुळे सर्वाधिक स्तरावर पोहोचतील. सोने प्रतितोळा ३३,५०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक्झिटनंतर आर्थिक बाजाराबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही, जे सोन्यासाठी सकारात्मक आहे. सोन्याचे दर डिसेंबर २०१६ पर्यंत वाढून ३३,५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज कॉमट्रेंड्ज रिसर्चचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांनी वर्तवला आहे. ज्ञानशेखर यांनी सांगितले की, डिसेंबर अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर १४७५ डॉलर प्रति औंस (अंदाजे ३ तोळे) होतील. युरोपीयन महासंघामधून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर शुक्रवारी सोन्याचे दर ८.२ टक्क्यांनी वाढून १३१९ डॉलर झाले होते. त्यावेळी भारतात सोने १७०० तर चांदी १४०० रुपयांनी महाग झाली होती.

Leave a Comment