शिर्डी मंदिरातील साई मूर्तीचे रहस्य

talim
शिर्डीत जीवनकाल व्यतीत केलेले थोर संत साईबाबा यांना प्रत्यक्ष पाहिलेले अनेक लोक आहेत. समाधीनंतरही आपल्या भाविकांना संकटकालात मार्गदर्शन करतो अशी भाविकांची श्रद्धा असलेला हा अवलिया अ्नेकांच्या गुरूस्थानी आहे. जगाच्या कानाकोपर्‍यात त्यांची मंदिरे पाहायला मिळतात आणि बहुतेक सर्व ठिकाणी त्यांची मूर्ती सारखीच असते. एका विशिष्ठ प्रकारे बसलेल्या या मूर्तीची स्थापना सर्वप्रथम शिर्डीतच झाली व नंतर त्याच्या अनेक प्रतिकृती ठिकठिकाणच्या मंदिरातून स्थापन केल्या गेल्या.

शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीबद्दल अशी कथा सांगितली जाते की जेथे साईबाबांची समाधी आहे तेथे १९५४ सालापर्यंत त्यांच्या फोटोचीच पूजा केली जात असे. मात्र एकदिवस मुंबई बंदरात इटालीतून एक पांढरा स्वच्छ संगमरवराचा मोठा खडक आला. तो कुणी पाठविला होता व का पाठविला होता याची कांहीही माहिती मिळत नाही. हा दगड साई संस्थानने घेतला व त्यातून साईंची मूर्ती करण्याचे काम गुणी शिल्पकार वसंत तालीम यांना दिले. तालिम यांनी साईंना प्रार्थना केली व तुम्ही कसे दिसता तशीच मूर्ती मला बनवायची आहे तेव्हा दर्शन द्या अशी मनापासून प्रार्थना केली आणि साईंनी त्यांना दर्शन दिले त्यानुसार ही मूर्ती बनविली गेली. मंदिराच्या कोणत्याही कोपर्‍यात उभे राहून मूर्तीकडे पाहिले तरी ती आपल्याकडेच पाहते आहे असे भाविकांना जाणवते. खरी भक्ती असणार्‍या भाविकांच्या संकटकाळात साई स्वतः येऊन दुःख निवारण करतात असा अनेकजण अनुभव सांगतात.

Leave a Comment