भारतीय नागरिकांचा परदेशात १३ हजार कोटींचा काळा पैसा

black-money
नवी दिल्ली – भारतीय नागरिकांनी परदेशातील बॅंक खात्यात ठेवलेल्या सुमारे १३ हजार कोटींच्या काळ्या पैशाची माहिती मिळविण्यात केंद्र सरकारला यश आले असून २०११मध्ये ४००तर २०१३मध्ये ७००बॅंक खात्यांची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिनिव्हा येथील एचएसबीसी बॅंकेत भारतीय नागरिकांकडून जमा करण्यात आलेल्या ४०० बँक खात्यांची माहिती फ्रान्स सरकारने भारत सरकारला दिली होती. प्राप्तिकर विभागाकडून चौकशी केल्यानंतर या बॅंक खात्यांमध्ये ८१८६ कोटींचा काळा पैसा असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ‘इंटरनेशनल कंजोर्शियम ऑफ इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट्स‘ (आयसीआयजे) या संकेतस्थळावर २०१३मध्ये भारतीय नागरिकांद्वारे उघडण्यात आलेल्या ७०० बॅंक खात्यांचा तपशिल खुला करण्यात आला होता. त्यातही ५०००कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली होती. या दोन्ही मिळून ११००खात्यांमध्ये भारतीयांच्या १३ हजार कोटींच्या काळ्या पैशाची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment