प्रजनन क्षमतेवर धूम्रपानाचा होतो परिणाम

smoking
मुंबई : माणसाच्या शरीराच्या प्रजनन क्षमतेवर धूम्रपानामुळे परिणाम होत असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. तसेच पुरुषांना धूम्रपानामुळे वंधत्वाचा धोका असल्याची माहितीही समोर आली आहे. ३० ते ५० टक्के पुरुषांमध्ये वंधत्वाचे कारण धूम्रपान असल्याचे समोर आले आहे. याबाबत ब्राझीलच्या साओ पावलो फेडरल युनिर्व्हसिटीचे वरिष्ठ लेखक आरपी बेर्टोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांच्या प्रजनन क्षमतेला धूम्रपानामुळे नुकसान पोहोचत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. संशोधनानुसार, धूम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या शुक्राणूमध्ये बदल झालेले पाहायला मिळाले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment