कोण आहे हा खाटेने जमीन नांगरणारा शेतकरी?

farmer
जळगाव : सध्या सोशल मीडियावर या शेतकऱ्याला नेटकरी सलाम ठोकत आहेत, पण व्हॉटसअॅपवर आलेली सर्वच माहिती खरी असतेच असे नाही, म्हणून या शेतकऱ्याचा शोध घेतला असता यावरून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावचा हा शेतकरी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विठोबा हरी मांडोळे असे या शेतकऱ्याचे नाव असून तीन एकर कापसाचे शेत त्यांनी खाटीने नांगरल्याचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा झाला आहे, दुष्काळाचा शेतकऱ्यावरचा परिणाम यातून दिसून आला आहे. गुंठाभरही जमीन विठोबा यांच्या नावावर नाही, हाफिज खाटीक यांची ३ एकर जमीन २५ हजार वार्षिक मोबदला देऊन ते कसतात, मात्र मागील वर्षी कसायला घेतलेल्या या जमिनीतून, विठोबांना २५ हजार तर निघालेच नाहीत, पण खत, बियाणे आणि इतर खर्च वाढले, त्यांना मोठा तोटा झाला.

बियाण्यांसाठीच कसाबसा पैसा आणला, मात्र बैलजोडीवाल्यालाच बैलांना महाग चारा देणे कठीण झाल्यामुळे भाड्याने बैलजोडी आणायला पैसा नाही. बैलजोडी एका दिवसाला ७०० रूपये घेते. विठोबा यांच्या शेताच्या बाजूला आश्रम शाळा आहे, तेथील शिक्षक म्हणतात, विठोबा शेतात दिवसा काय पण रात्रीही शेतात राबताना दिसतात, पण त्यांच्या हातात काहीच न आल्याने त्यांना बैल आणि औताचे काम एकट्यालाच करण्याची वेळ आली असावी, त्यांची पत्नी देखील शेतात रात्रंदिवस राबताना दिसते.

Leave a Comment